कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाहकर्नाटकातील हुबळी येथे एका कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने ते कार्यक्रमाला येवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा कोल्हापूरचा दोन दिवशीय दौराही रद्द झाला.
हुबळी येथे कार्यक्रमासाठी आलेल्या शाह यांची तब्येत बिघडल्याने तेथूनच ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. शाह यांचा दौरा रद्द झाल्याने साहजिकच भाजपचे नेते, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे कोल्हापूरला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही दौरे रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
केएलई सोसायटीच्या कार्यक्रमासाठी शाह हे सकाळी हुबळीत दाखल झाले. परंतू त्यांची तब्येत बिघडल्याने ते तेथील कार्यक्रमालाही गेले नाहीत. त्यांनी तेथेच विश्रांती घेतली. अशक्तपणामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने तेथूनच ते दिल्लीला रवाना झाले.
हुबळी येथील कार्यक्रमानंतर शाह हे एकसंबा ता. चिक्कोडी येथे माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या बीरेश्वर पतसंस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन करून संध्याकाळी कोल्हापुरात येणार होते. तर उद्या रविवारी ते हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यावरील विशेष प्रकल्पाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडूनही करण्यात आली होती. परंतू त्यांची तब्येत बिघडल्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत.
शाह यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विमानतळापासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत विशेष पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. शहरात सर्वत्र शाह यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते ते उतरवले जात होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक प्रकृती बिघडली; कोल्हापूर दोन दिवशीय दौरा रद्द, स्वागत फलक उतरवले
by Team Satara Today | published on : 19 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा