सातारा : एकास मारहाण करून त्याच्या ऑफिसचे नुकसान केल्याप्रकरणी 12 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पांडुरंग आप्पासाहेब डंबाळे (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) यांना तसेच त्यांच्या वडिलांना 15 सप्टेंबर रोजी झालेल्या वादाच्या कारणातून तेथीलच निलेश कणसे, सचिन कणसे व इतर दहा ते बारा लोकांनी मारहाण, शिवीगाळ करून त्यांच्या ऑफिसचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
by Team Satara Today | published on : 19 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा