मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे कार्य जोमात पुढे सुरु ठेवणार - नंदुकमार सावंत : वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

by Team Satara Today | published on : 19 September 2026


सातारा : सातार्‍यात मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनामुळे सातारकरांना एक मोठी साहित्यिक पर्वणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शाहूपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यामुळे मिळाली. संमेलन यशस्वी करण्यात शाहूपुरी शाखेचे कार्यकारणी सदस्य, सभासद, सातारकरांचा मोठा वाटा आहे. या संमेलनानंतरही यापुढेही शाहूपुरी शाखेचे काम असेच जोमाने करत राहू, असे आश्वासन शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण दिली.
मसाप, पुणे शाहूपुरी शाखेची सभा खेळीमेळीत नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झाली. यावेळी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मसाप, पुणे शाहूपुरी शाखेच्या कार्यास यापुढेही सहकार्य व पाठिंबा असेल असे सांगितले. कित्येक वर्षे पाहिलेले साहित्य संमेलनाचे स्वप्न बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे साकार करू शकलो. यात सर्वांचेच मोठे सहकार्य लाभले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रारंभी महाराष्ट्र गीत झाल्यावर दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या नोटिसीचे वाचन व सभेचे सूत्रसंचालन ड. चंद्रकांत बेबले यांनी केले. सचिन सावंत यांनी आर्थिक पत्रके सादर केले आभार वजीर नदाफ यांनी मानले. या सभेला किशोर बेडकीहाळ, अजित साळुंखे, विक्रम पाटील, आर.डी. पाटील, संजय माने, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, अनिल जठार, सतीश घोरपडे, किरण कदम, उमेश पाटील, राजन घोणे आणि शाहुपुरी शाखेचे सभासद उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाईत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्टलसह पाच जिवंत काडतुसे जप्त; वाई डीबी पथकाची कारवाई
पुढील बातमी
सातारा शहरासह तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या