आरे येथील ग्रामस्थांना टँकरने मोफत पाणी पुरवठा; लक्षहिरा फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक

by Team Satara Today | published on : 18 September 2026


सातारा : पाणी पुरवठा योजनेतील मोटार बिघाडामुळे आरे, ता. सातारा येथील ग्रामस्थांची पाण्याची समस्या निर्माण झाली होती. यावेळी लक्षहिरा फाउंडेशनतर्फे ग्रामस्थांना टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यात आला. या सामाजिक बांधिलकीबद्दल लक्षहिरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आरे येथील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची मोटार ना दुरुस्त झाल्याने दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला. अशा वेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणत होते. पाण्याची कमतरता पाहता लक्षहिरा फाउंडेशनचे अध्यक्ष व खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विश्वजित किर्तीकर यांनी ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून टँकर मागवण्याच्या सूचना केल्या.
लक्षहिरा फाउंडेशनचे सचिव राहूल किर्तीकर यांनी टँकर मागवून ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे ग्रामस्थ व महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ थांबली. या उपक्रमासाठी लक्षहिरा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आपली फलटण मॅरेथॉन २०२६ ची दशकपूर्ती : २५ ऑक्टोबरला आरोग्य आणि आनंदासाठी धावणार फलटणकर
पुढील बातमी
सातारा जिल्हा रुग्णालयात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, रुग्ण, त्यांचे नातेवाईक हैराण

संबंधित बातम्या