वडूज : वडूज, ता. खटाव येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून अंदाजे सहा लाख रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वडूज-कराड रस्त्यावर बँकेचे एटीएम आहे. पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील अंदाजे ६ लाखांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार गणेश शिरकुळे, शिवाजी खाडे व गृहरक्षक दलाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
गेल्या १५ दिवसांत वडूज पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वाकेश्वर, सिद्धेश्वर कुरोली व नायकाचीवाडी या तीन गावांत मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढल्याची चर्चा आहे. आता चोरट्यांनी थेट वडूज शहरात प्रवेश करत एटीएमवर डल्ला मारल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
वडूजमध्ये महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून सहा लाखांची रोकड लंपास; प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
by Team Satara Today | published on : 17 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा