वाढे येथे मिठाई दुकानातील कामगारांना दुकानाबाहेर काढून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 September 2026


सातारा : वाढे (ता. जि. सातारा) येथील ‘वाढेकर बंधू कंदी पेढेवाले’ मिठाई दुकानातील कामगारांना बाहेर काढून मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर भीमराव चव्हाण यांनी फिर्याद दिली. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी विशाल सुधाकर नलावडे, ज्योती विशाल नलावडे व अन्य दोघे दुकानात आले. त्यांनी कामगारांना बाहेर काढून अर्जुनसिंग याचा सुमारे 10 हजारांचा मोबाईल हिसकावल्याचा आरोप आहे. दुकानाला कुलूप लावल्यानंतर कामगारांना वाहनातून वाढेफाटा येथे नेऊन मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागे दुकान बंद करण्यावरून वाद; तरुणावर रॉडने हल्ला
पुढील बातमी
सातारा बसस्थानक परिसरात गर्दीत महिलेच्या अंगावरील 60 हजारांचे दागिने लंपास

संबंधित बातम्या