सातारा : मरळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे सुरू असलेले काम गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी संबंधित यंत्रणेला दहा दिवसांची मुदत दिली आहे. आरोग्य केंद्रातील विविध सुविधांची पाहणी करतानाच त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
याशनी नागराजन यांनी बुधवारी (दि. 16) प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणार्या आरोग्य सेवा, सुविधा आणि केंद्रातील व्यवस्थेची माहिती घेतली. आरोग्य केंद्रात येणार्या नागरिकांना आवश्यक उपचार व सेवा वेळेत मिळतील, यासाठी संबंधितांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर त्यांनी केंद्राच्या नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. इमारतीतील रंगकाम, खिडक्या व दरवाजे बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले. ही कामे अधिक विलंब न करता गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उर्वरित कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याची स्पष्ट सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आली.
इमारतीतील विद्युतविषयक कामांबाबतही त्यांनी आढावा घेतला. इलेक्ट्रिकल विभागाशी समन्वय साधून त्यांच्या अखत्यारितील कामेही निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सरिता पवार, उपअभियंता महेश पवार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
मरळी आरोग्य केंद्राचे काम दहा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची पाहणी; आरोग्य सेवांचा घेतला आढावा
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा बसस्थानक परिसरात गर्दीत महिलेच्या अंगावरील 60 हजारांचे दागिने लंपास
September 16, 2026
के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागे दुकान बंद करण्यावरून वाद; तरुणावर रॉडने हल्ला
September 16, 2026
बाप्पांच्या आगमनावेळी पालमध्ये दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी, सात जण जखमी
September 16, 2026
कुडाळ येथे गणपती मिरवणुकीत बीम लाईटचा वापर; दोन मंडळांवर गुन्हे दाखल
September 16, 2026