सातारा जिल्हा परिषदेत भक्तिमय वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना; दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन

by Team Satara Today | published on : 15 September 2026


सातारा : जिल्हा परिषदेच्या स्वागत कक्षामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त विघ्नहर्ता श्री गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे सामात्र्नय प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमध्ये यंदाचा गणेशोत्सव दि. 22 सप्टेंबर पर्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी व सायंकाळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव काळात जिल्हा परिषद परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर श्रींची विधिवत आरती करून गणरायाची विसर्जन मिरवणूक व विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी गणरायाकडे सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांच्या आरोग्य, यश व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने जिल्हा परिषदेत उत्साह, भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या चूलत बंधूंचे निधन
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत अभियंता दिन उत्साहात साजरा; अभियंत्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आदर्श अभियंता पुरस्कार’ देण्याची घोषणा

संबंधित बातम्या