खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीत गॅस गळती होऊन स्फोट; इमारत कोसळली, कंपनीला सुटी असल्याने अनर्थ टळला

by Team Satara Today | published on : 14 September 2026


खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या स्वयंपाकगृहात पीएनजी पाइपलाइन सुरू राहिली. यावेळी हवेचा दाब तयार झाल्याने गॅस गळती होऊन स्फोट झाला. यात स्वयंपाकगृहाची इमारत कॉलमसह पडली. ही घटना शनिवार, दि. १२ रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. संबंधित कंपनीला शनिवार सुटी असल्याने अनर्थ टळला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, धनगरवाडी हद्दीतील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. शनिवारी कंपनीला सुटी असल्याने संबंधित कंपनीच्या ठिकाणी परिसरात सुरक्षारक्षक वगळता कोणीही नव्हते. रात्री अकराच्या सुमारास कंपनीच्या स्वयंपाकगृहाला पुरवठा करणारी गॅस पाइपलाइन सुरू राहिल्याने तेथे हवेचा दाब तयार झाला. नंतर मोठ्या प्रमाणात स्फोट झाला. यात स्वयंपाकगृहाची इमारत कॉलमसह उद्ध्वस्त होत नेस्तनाबूत झाली.
अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे कंपनी परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी तसेच शिरवळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश इंगळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी स्फोटाचे आवाज येताच तत्काळ एशियन पेंट्स अग्निशमन बंब तसेच इतर ठिकाणचे अग्निशमन बंबांना पाचारण केले. स्फोटामुळे स्वयंपाकगृहाची इमारत पत्त्यासारखी कोसळत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत महामार्गालगत झुडुपांमध्ये तरुणीचा मृतदेह; डोळ्यांमध्ये मिरची पुड टाकून हत्या करण्यात आल्याचा संशय
पुढील बातमी
‘मराठा आरक्षणाचा विषय केवळ छत्रपती घराण्याच्या सहीने सुटणार नाही’; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जरांगे पाटील यांनी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करावे

संबंधित बातम्या