सातारा : मॉर्निंग वॉक करून घरी परतणार्या 62 वर्षीय वृद्धाला एसटी बसने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. धडकेनंतर बस त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने डावा पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. शनिवार पेठेतील मैत्री पार्कजवळ 13 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
अवधूत राजेंद्र देशमुख यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एसटी चालक शिवलिंग बाबुराव मुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
असीतकुमार शरदराव देशमुख हे समर्थ मंदिर ते गुरुवार पेठ मार्गावरून मॉर्निंग वॉक करून घरी जात होते. मैत्री पार्कजवळ बसने त्यांना पाठीमागून धडक दिली. खाली पडल्यानंतर बस त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस हयगयीने चालविल्याचा आरोप आहे. तपास महिला हवालदार वरे करीत आहेत.
साताऱ्यात मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा; एसटीची धडक, वृद्धाच्या पायांवरून बस
by Team Satara Today | published on : 14 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा