व्यवसायासाठी 50 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या छळ प्रकरणी सहाजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 September 2026


सातारा : व्यवसायासाठी माहेरहून तब्बल 50 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहाजणांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 35 वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे.
पुण्यातील नर्‍हे परिसरात सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत छळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पती किरण सावंत हा दारूच्या नशेत घरी येत असल्याबाबत तसेच अन्य महिलांशी संबंध असल्याबाबत पत्नीने विचारणा केली. त्यावरून त्याने शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
याशिवाय व्यवसायासाठी 50 लाख रुपये आणण्याचा तगादा पतीकडून सुरू होता. सासू-सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांनीही घरगुती कारणांवरून त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. किरण बाळासो सावंत यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल असून सहायक फौजदार सी. बी. माने तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हॉटेलमध्ये महिलेला धक्काबुक्की, कपडे फाडल्याचा आरोप; कोडोलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
जावयासह मुलीला दमदाटी तसेच शिवीगाळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या