सातारा : जुन्या वादाचा राग मनात धरून हॉटेलमध्ये महिलेला धक्काबुक्की करून तिचे कपडे फाडल्याचा प्रकार एमआयडीसी परिसरात घडला. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
11 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. वाहन पार्किंगमध्ये गाडी घासल्याच्या कारणावरून तसेच पैशांच्या व्यवहारातून फिर्यादी व संशयितांमध्ये पूर्वी वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर संशयितांनी महिलेच्या पतीशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला आर्यन पवार याने धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर शशिकांत पवार याने तिचे कपडे फाडल्याचा आरोप आहे. दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. शशिकांत कृष्णाजी पवार व आर्यन पवार (दोघे, रा. कोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल असून तपास हवालदार मोरे करीत आहेत.
हॉटेलमध्ये महिलेला धक्काबुक्की, कपडे फाडल्याचा आरोप; कोडोलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 14 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा