सातार्‍यातील सेव्हन स्टार इमारतीसमोरील भाजी मंडईत मोबाईल चोरट्यास नागरिकांकडून चोप; गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 13 September 2026


सातारा : सातार्‍यातील सेव्हन स्टार इमारतीसमोरील भाजी मंडईत मोबाईल चोरुन पळणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप दिला. संशयित परप्रांतीय अल्पवयीन असून त्याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रणजित विजयराव  मोहिते (वय 43, रा. राधिका रोड, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी 8 वाजता ही घटना घडली आहे. रणजित मोहिते हे भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत गेले होते. भाजी खरेदीमध्ये ते गुंतले असल्याचे पाहून एका मुलाने अलगद त्यांच्या खिशातील मोबाईल काढला. मोबाईल चोरुन संशयित तेथून निघून जात असताना ही बाब रणजित मोहिते यांच्या लक्षात आली. त्या मुलाचा पाठलाग करुन त्याला पकडले. मंडईत पळापळ झाल्याने नागरिक सतर्क झाले. संशयिताकडे मोबाईलबाबत विचारताच त्याने खिशातून मोबाईल काढून दिला.
मोबाईल चोरीची घटना समोर आल्यानंतर संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. या घटनेत मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सवात सातारा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 547 गावांत ‘एक गाव, एक गणपती’, 2900 पोलिसांसह एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड तैनात
पुढील बातमी
अतित गावच्या हद्दीत महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोन्ही दरवाजे तुटले

संबंधित बातम्या