वाहतुकीच्या वादातून वकिलाला मारहाण; दोनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 September 2026


सातारा : वाहन पुढे घेण्यावरून झालेल्या वादातून दोन जणांनी वकिलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मार्केट यार्डकडे जाणार्‍या रस्त्यावरील गंमत-जंमत बारजवळ 2 सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या मारहाणीत वकिलाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली.
कुलदीप अशोक भोसले (वय 42, रा. भोसले मळा, सातारा) यांनी याप्रकरणी 11 सप्टेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अविष्कार संदीप जाधव व महादेव बालाजी माने (दोघे रा. जकातवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहतूक कोंडीमुळे वाहन पुढे नेता येत नसल्याचे भोसले यांनी सांगितल्याने आरोपींनी वाद घातला. त्यातील एकाने त्यांच्या कानाखाली मारल्याने ते खाली पडले. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत त्यांचे घड्याळ व चष्माही फुटला. जबड्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. तपास महिला पोलीस हवालदार देखणे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड बालसुधारगृहातील मारहाणीत मुलाचा मृत्यू; नातेवाइकांचा बालसुधारगृहासमोर ठिय्या
पुढील बातमी
पाळीव कुत्र्यावर कोयत्याने वार; एकावर गुन्हा

संबंधित बातम्या