सातारा : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित महिलेला सातत्याने मारहाण व मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मल्हारपेठ परिसरातील या घटनेने कौटुंबिक वादाचे गांभीर्य समोर आले आहे.
मल्हारपेठेत राहणार्या 24 वर्षीय महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पतीसह सासरच्या व्यक्तींकडून चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. या कारणावरून वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रारीवरून पती असदुल्ला समीर पठाण, रजिया समीर पठाण, समीर मुबारक पठाण आणि फैज पठाण (सर्व रा. मल्हारपेठ, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. महिला पोलीस हवालदार सुडके पुढील तपास करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा