चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस मारहाण; पतीविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 September 2026


सातारा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. एवढ्यावर न थांबता लोखंडी कुदळीने तिच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर वार केल्याची घटना माजगाव (ता. जि. सातारा) येथे घडली. याबाबत सुरज मनोहर गावडे (रा. ढपरापूर, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 9 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयिताने पत्नीला चारित्र्यावरून जाब विचारत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर मारहाण करून घरातील लोखंडी कुदळीने तिच्या हाताच्या बोटावर वार केला.
या प्रकारानंतर तुझे हात-पाय तोडीन, तुला मारून टाकीन’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पत्नीच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली, तर तिच्या बहिणींना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पुढील तपास बोरगाव पोलिसांकडून सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरी प्रकरणी दोनजणांना अटक; 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई
पुढील बातमी
चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

संबंधित बातम्या