फडतरवाडीत जुन्या वादातून दोन गटांत झालेल्या मारहाणीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : फडतरवाडी (ता. जि. सातारा) येथे जुन्या वादातून दोन गटांत झालेल्या मारहाणीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
दि. ९ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. बबनराव विठ्ठल चव्हाण (वय ६४) यांच्या फिर्यादीनुसार वैभव उत्तम रामपुरे, नितीन चंद्रकांत यादव आणि राज अनिल खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जुन्या वादातून शिवीगाळ व धमकी देत नितीन यादव याने लाकडी दांडक्याने चव्हाण यांच्या पायावर मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अमृता चव्हाण यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, नितीन यादव (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन बबन चव्हाण आणि नितीन बबन चव्हाण यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून दोन्ही तक्रारींचा तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बाजारातून अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली
पुढील बातमी
पाडळीत बंद घर फोडून ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या