सातारा : सातारा शहरातील सदर बाजार परिसरात हनुमान मंदिरासमोर पार्क केलेली स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. या वाहनाची किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे.
अक्षय दत्तात्रय शिंदे (वय ३२, रा. सदर बाजार, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार, काळ्या रंगाची स्प्लेंडर (एमएच ११-सीएस ९५९७) दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मंदिरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास ती जागेवर आढळली नाही.
याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस हवालदार यादव तपास करीत आहेत.
सदर बाजारातून अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा