सातारा एसटी स्टँड परिसरात पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : मुलीला मारहाण केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना सातारा एसटी स्टँड परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस हवालदार देवदास सनस यांच्या फिर्यादीनुसार सतीश दशरथ मर्ढेकर (वय ४३, रा. आंबेदरे) याच्यावर कारवाई करण्यात आली. दि. ९ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास संशयिताला मोटारसायकलवरून पोलिस ठाण्यात नेण्यात येत होते. एसटी स्टँड ते पोलीस मुख्यालय मार्गावर त्याने पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर मर्ढेकर याने सनस यांच्या शासकीय गणवेशाची गचुंडी पकडून बटण तोडल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस हवालदार भोंडवे पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीजचोरीनंतर तडजोड रक्कम न भरल्याने ग्राहकाविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
विनापरवाना दहीहंडी उत्सव व मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या