‘सातारा टुडे’च्या ‘मॅरेथॉन पंढरी’ विशेषांकाचे खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रकाशन

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : ‘सातारा टुडे’ वृत्तसमूहाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मॅरेथॉन पंढरी’ या विशेषांकाचे आज दि.१० रोजी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे प्रकाशन करण्यात आले.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनने साताऱ्याची देश-विदेशात क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या क्रीडा चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ‘सातारा टुडे’ने केले असून, त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
सातारा हिल मॅरेथॉनकडे देशासह जगभरातील धावपटूंचे लक्ष वेधले गेले आहे. ही स्पर्धा आता केवळ धावण्यापुरती मर्यादित न राहता आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामाजिक सहभागाचा उत्सव बनली आहे. साताऱ्याच्या क्रीडा संस्कृतीचा आणि मॅरेथॉनच्या प्रवासाचा वेध घेणारा ‘मॅरेथॉन पंढरी’ विशेषांक वाचकांसाठी माहितीपूर्ण ठरेल, असे उदयनराजे भोसले यांनी नमूद केले.
विशेषांकामध्ये सातारा हिल मॅरेथॉनचा प्रवास, देश-विदेशातून सहभागी होणाऱ्या धावपटूंचे अनुभव, आरोग्य व तंदुरुस्तीचे महत्त्व, तसेच मॅरेथॉनमुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थकारणाला मिळालेली चालना याबाबतचे लेख व विशेष वार्तांकन समाविष्ट करण्यात आले आहे. दर्जेदार संपादन, सुबक मांडणी आणि आकर्षक छपाई ही विशेषांकाची वैशिष्ट्ये आहेत.
प्रकाशन सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांचे स्वीय सहाय्यक काका धुमाळ, अभिजीत भालेराव, नवीन साई, कुंदन चव्हाण, रवींद्र महाडिक यांच्यासह ‘सातारा टुडे’चे मुख्य संपादक संग्राम निकाळजे उपस्थित होते. विशेषांकाच्या प्रकाशनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘सातारा टुडे’च्या संपादकीय टीमचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मेडिकल कॉलेजच्या रोजगारात भूमिपुत्रांना संधी देणार
पुढील बातमी
‘एसटी आपली ॲप’मधून बससेवेची माहिती उपलब्ध होणार; 'एमएसआरटीसी रिझर्वेशन' अधिकृत मोबाइल ॲप विकसीत

संबंधित बातम्या