अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव; प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत दि. 18 सप्टेंबर

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुख्य शाखा मुंबई  यांच्या वतीने "नाट्य परिषद करंडक 2026" हा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शंभराव्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून  'उत्सव रंगभूमीचा जागर हौशी नाट्य कलावंतांचा' असं ब्रीदवाक्य घेऊन सुरू केलेला हा महोत्सव सलग तिसऱ्या वर्षीही दिमाखात आयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा महाविद्यालये तसेच नाट्य संस्था इत्यादींसाठी खुली आहे. या स्पर्धेचे स्वरूप प्राथमिक, विभागीय आणि अंतिम असे राहील. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला एक लाख व अन्य विजेत्यांनाही भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.  इतर जिल्ह्या प्रमाणे साताऱ्यातही याची प्राथमिक फेरी होणार  आहे.  तरी साताऱ्यातील हौशी कलावंतांनी, महाविद्यालयांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.  
या स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत दिनांक 18 सप्टेंबर 2026 आहे, यासाठीचे  प्रवेश नाट्यपरिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरायचे आहेत.  अंतिम फेरी मुंबई येथे 28 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.  सातारा केंद्रप्रमुख म्हणून राजेश कुंभारदरे तसेच सातारा स्थानिक समन्वयक म्हणून बाळकृष्ण शिंदे आणि आनंद उर्फ बाळू कदम काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.natyaparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लिंब येथील औद्योगिक डीपी फोडून ६० किलो तांब्याची तार लंपास; अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या