वाढे गावच्या हद्दीत हायवे रोडलगत नाश्त्यासाठी थांबले अन् मोबाईल, दुचाकी घेऊन चोरटे पसार

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : वाढे गावच्या हद्दीत हायवे रोडलगत असलेल्या कदम हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल आणि त्याच्या मित्राच्या चुलत्याच्या मालकीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेत एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष दत्तात्रय कर्णे (वय २२, रा. डिस्कळ, ता. खटाव, सध्या रा. म्हसवे, ता. जि. सातारा) हा मित्रासोबत हॉटेलमध्ये गेला होता. दि. ६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा पाच हजार रुपये किमतीचा पोको कंपनीचा मोबाईल आणि अविनाश विरसिंग कापसे यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न चोरीला गेली.
दुचाकीचा क्रमांक एमएच-११-बीटी-२९७४ असून, तिच्या हेडलाईटवर गणपतीचे स्टिकर असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक वायदंडे अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा गांधी मैदान येथे दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; डीजेप्रकरणी मालक-चालक व अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
धनगरवाडीत घराबाहेर लावलेली दुचाकी गायब; सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या