सातारा : राज्य शासनाच्या वतीने 'राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे' या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कष्टकरी व प्रगतिशील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच पात्र शेतकऱ्यांची निवड दि. १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण एकाहत्तर अर्जधारक शेतकऱ्यांमधून पाच जणांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे.
यामध्ये फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि सातारा तालुक्यातील पुरुष व महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना युरोप आणि चीनमधील आधुनिक शेतीचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ‘या’ पाच शेतकऱ्यांची परदेश दौऱ्यासाठी निवड
नीलेश हणमंत पवार, रा. खंडाळा, ता. खंडाळा
मंगल विलास साबळे, रा. शिवथर, ता. सातारा
संग्रामसिंह बाळासो जाधव, रा. हनुमंतवाडी, ता. फलटण
बाळकृष्ण उत्तम बंडगर, रा. होहेवाडी, ता. कोरेगाव
तुषार सुहास गायकवाड, रा. कुमठे, ता. कोरेगाव
सातारा जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांची परदेश दौऱ्यासाठी निवड, युरोप आणि चीनमधील आधुनिक शेतीचा अभ्यास करणार
by Team Satara Today | published on : 08 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा