शनिवार पेठेत घरफोडी; सुमारे 60 हजारांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : शनिवार पेठेतील जुन्या प्रभात टॉकीजमागील बंद घराचा मागील दरवाजा उघडून अज्ञाताने घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ६० हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ही चोरी २१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत घडली. याबाबत शालन श्रीराम जाधव (वय ६९) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, चोरट्याने मागील दरवाजातून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याच्या दोन चेन, दोन अंगठ्या, एकदाणी, बांगडी, कानातील वेल, बुगडी, चांदीचा छल्ला व मासोळ्या तसेच १५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल नेला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार कणसे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चाहूरखेडमध्ये घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
सृष्टी बिरामणेच्या मृत्यूप्रकरणी साताऱ्यात मशाल मोर्चा; दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी

संबंधित बातम्या