अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा; आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील घटना, जखमी विद्यार्थिनीच्या आईची तक्रार

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : शाळेच्या पॅसेजमध्ये लिफ्टच्या बांधकामासाठी उभारलेले ग्रील सुरक्षितपणे न बसवल्याने ते विद्यार्थिनीच्या अंगावर पडून ती जखमी झाल्याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २३ जुलै रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. बांधकामासाठी पॅसेजमध्ये उभे केलेले ग्रील विद्यार्थिनी आराध्या हिच्या अंगावर पडल्याने तिच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. याबाबत आयकर सल्लागार निवेदिता नागेश साळुंखे (वय ३९, रा. शाहूनगर, सातारा) यांनी ७ सप्टेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार विजय नामदेव जाधव (रा. यशोदानगर, गोडोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नोटीस देऊनही नगरपरिषदेच्या जागेवरील बांधकाम न हटवल्याने कोडोलीतील दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
चाहूरखेडमध्ये घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या