नोटीस देऊनही नगरपरिषदेच्या जागेवरील बांधकाम न हटवल्याने कोडोलीतील दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : नगरपरिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेवरील बांधकाम हटवून जागा मोकळी करण्याची नोटीस देऊनही तिची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी कोडोलीतील दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे लिपिक विश्वास लक्ष्मण गिरीगोसावी (वय ५४) यांनी याबाबत फिर्याद दिली.
सुजित सतीश पिसाळ आणि सतीश विठ्ठल पिसाळ (दोघेही रा. कोडोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोडोली परिसरातील स. नं. २९५, जिल्हा परिषद शाळा, इंदिरानगर, विलासपूर येथील नगरपरिषदेच्या खुल्या जागेवरील बांधकाम निष्कासित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील कलम ५२ व ५३ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, संबंधितांनी बांधकाम हटविले नसल्याने कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक मोहिते तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून तरुणीला धमकी देणाऱ्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा; आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील घटना, जखमी विद्यार्थिनीच्या आईची तक्रार

संबंधित बातम्या