महिलेचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप; संशयितावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 September 2026


सातारा : किराणा दुकानात आलेल्या व्यक्तीने महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. महिलेच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला असून, या प्रकरणी शकील निजाम फरास (रा. नेले फरासवाडी) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित किराणा दुकानात आला होता. त्यावेळी त्याने महिलेचा हात पकडला. तसेच तिच्याशी प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि खांद्याला हात लावून अश्लील नजरेने पाहत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बुधवार नाका येथे दहीहंडीच्या जल्लोषात ध्वनिमर्यादा भंग; डीजेप्रकरणी दोघांवर कारवाई
पुढील बातमी
शटरचे कुलूप काढण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण; खणआळीत दोन गटांत मारामारी

संबंधित बातम्या