बुधवार नाका येथे दहीहंडीच्या जल्लोषात ध्वनिमर्यादा भंग; डीजेप्रकरणी दोघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 07 September 2026


सातारा : दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याचे तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने स्टेज उभारल्याचे आढळून आल्याने शाहूपुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवार नाका परिसरातील या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.
५ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्यान बुधवार नाका येथे दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेल्या स्टेजमुळे पादचारी तसेच वाहनधारकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय ऊर्फ ऋतिक विनोद कांबळे (२६) आणि अनिकेत महेंद्र रावळ (२४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप दोघांवर आहे. दोघांना बीएनएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हवालदार इंगळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढीव विद्यार्थी संख्या, वेतन अनुदानाचा प्रस्ताव; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडून दिव्यांग संस्थांची तपासणी
पुढील बातमी
महिलेचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप; संशयितावर गुन्हा

संबंधित बातम्या