सातारा : सदरबझार येथील बाल निरीक्षक गृहाच्या आवारातून १६ वर्षीय बालक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. खेळण्यासाठी मैदानात गेलेला अरुण कुमार हा परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्याला नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दि. ५ रोजी सायंकाळी ५.४५ ते ७.३० या कालावधीत अरुण मैदानावर खेळत होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. तो उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
विजय साबळे यांच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल तपास करीत आहेत.
बालगृहातून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 06 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा