सातारा : महाराष्ट्रात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करणाऱ्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. गुरुवार पेठेत केलेल्या छाप्यात सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.
आसिफ इस्माईल खान (४२) याच्याकडे विविध कंपन्यांचा पानमसाला व तंबाखूचा साठा आढळला. हिरा, विमल, आरएमडी, व्ही-१ यांसह विविध ब्रँडचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला.
अन्नसुरक्षा अधिकारी ऋतुजा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
गुरुवार पेठेत गुटख्याचा साठा जप्त; १.४० लाखांचा माल पोलिसांच्या ताब्यात
by Team Satara Today | published on : 06 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा