गोडोलीत ऑनलाइन जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 06 September 2026


सातारा : गोडोली नाका परिसरात संगणकावर चक्री जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तिघांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य व मोटारसायकल असा १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ऋतिक जितेंद्र शिंदे (२६), अनुराग राजेंद्र चौगुले (२३) व अनिकेत शिंदे (तिघे रा. सातारा) हे संगणकाच्या माध्यमातून जुगार चालवित असल्याचे आढळले. खडतरे बिल्डिंगच्या तळमजल्यावरील खोलीत दि. ५ रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. जुगारासाठी आयडीचा वापर होत असल्याचेही तपासात समोर आले.
जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी मालक लक्ष्मण काशीनाथ खडतरे यांच्यावरही आरोप आहे. सुहास कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मित्राला मारहाण का करता असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला
पुढील बातमी
गुरुवार पेठेत गुटख्याचा साठा जप्त; १.४० लाखांचा माल पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या