बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरुणीचा सातारा तालुका पोलिसांकडून अवघ्या चार तासांत शोध

by Team Satara Today | published on : 06 September 2026


सातारा : पहाटे घरातून बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरुणीचा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेतला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे करंजे पेठेतून तिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
वनगळ येथील तरुणी दि. ५ रोजी पहाटे पाचपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी अपहरणाची शक्यता व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणातून तिचे ठिकाण शोधले. करंजे पेठेत सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सृष्टी बिरामणे आत्महत्या प्रकरणी हॉस्टेल प्रशासन अडचणीत; रेक्टर, प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
मित्राला मारहाण का करता असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला

संबंधित बातम्या