सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या लेडीज हॉस्टेलमधील सृष्टी बिरामणे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रेक्टर, प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरुद्ध सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सृष्टीचे वडील भानुदास बिरामणे यांच्या फिर्यादीनुसार, हॉस्टेलमधील गैरसोयींबाबत तिने तक्रारी केल्या होत्या. त्यावरून तिच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. दि. २ सप्टेंबर रोजी तिला कॉलेजमधून काढण्याची व पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देण्यात आली तसेच कबुलीचा व्हिडिओ घेण्यात आल्याचा दावा फिर्यादीत आहे.
यानंतर सृष्टीने हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक म्हेत्रे तपास करीत आहेत.
सृष्टी बिरामणे आत्महत्या प्रकरणी हॉस्टेल प्रशासन अडचणीत; रेक्टर, प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा
by Team Satara Today | published on : 06 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा