सातारा : कीर्तनाच्या कार्यक्रमात नाव घेतले नसल्याच्या कारणावरून शाहूनगर येथील घरात प्रवेश करून महिलांना दमदाटी केल्याच्या तसेच फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण उत्तम माने (रा. शाहूनगर), उमेश किर्दत (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) आणि प्रशांत बापुसाहेब भोसले (रा. एकसळ, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
अर्चना मदन कदम (रा. शाहूनगर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संशयितांनी मदन कदम यांना शिवीगाळ केली तसेच आठ दिवसांत जीवे मारण्याची धमकी दिली. शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कीर्तनात नाव न घेतल्याच्या कारणावरून घरात प्रवेश करून महिलांना दमदाटी ; तिघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा