सातारा बाजार समितीतील अर्जावरून अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप; सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : बाजार समितीच्या कार्यालयात येऊन अर्जावर निर्णय घेण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिल्याप्रकरणी महागाव (ता. सातारा) येथील महेश कांबळे याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाजार समितीचे अधिकारी विजय व्यंकटराव गोडसे (रा. शाहूनगर) यांनी तक्रार दिली आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जागा दिल्यास अर्ज मागे घेईन आणि पुढे त्रास देणार नाही, असे सांगून कांबळे याने धमकीवजा भाषा वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नक्षलविरोधी मोहिमांमध्ये यशस्वी कार्यवाहीबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना विशेष सेवा पदक प्रदान
पुढील बातमी
कीर्तनात नाव न घेतल्याच्या कारणावरून घरात प्रवेश करून महिलांना दमदाटी ; तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या