सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरू; सात खरेदी केंद्रांना मान्यता

by Team Satara Today | published on : 04 September 2026


सातारा :  किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरिप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी) खरेदी करण्यासाठीची पूर्वतयारी बैठक मा. जिल्हाधिकारी महोदय, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सातारा जिल्ह्यात  १ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
भरडधान्य (मका) खरेदीः ०२ केंद्रांवर ४४८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, ३४४ शेतकऱ्यांकडून ९४२७.५० क्विंटल मका खरेदी करण्यात आली व शेतकऱ्यांना २,२६,२६,०००/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड सोयाबीन खरेदीः ०९ केंद्रांवर ८४२ शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८१६ शेतकऱ्यांकडून ९७११.०० क्विंटल सोयाबीन खरेदी करून ५,१७,४०, २०८/- रुपये अदा करण्यात आले. नाफेड चना खरेदी - ०९ केंद्रांवर ९० शेतकरी नोंदणी अंतर्गत, ८० शेतकऱ्यांकडून ८७९.०० क्विंटल चना खरेदी करून ५१,६४,१२५/- रुपये अदा करण्यात आले.
मागील हंगामात सुरळीत व विना-तक्रार कार्यरत असलेली २ केंद्रे (फलटण व माण (दहिवडी)) या हंगामातही कायम ठेवण्यात आली असून, शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी नवीन ५ केंद्रे जोडण्यात आली आहेत. त्यानुसार एकूण ७ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल.
पूर्वीची कार्यरत २ केंद्रेः फलटण व माण (दहिवडी) नवीन मंजूर ५ केंद्रे सातारा, वाई, मसूर, कोरेगाव व कवठे. शेतक-यांनी   मुदतीत आपल्या नजीकच्या अधिकृत केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
निवृत्तीवेतनधारकांनी ७ सप्टेंबर रोजी सातारा कोषागारात कार्यशाळेस उपस्थित राहावे - कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे

संबंधित बातम्या