सातारा : चक्री जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तीन जणांविरोधात कारवाई करत सुमारे 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 2 रोजी सातारा शहरातील सुटकेस चौक परिसरात चालू केलेल्या चक्री जुगार प्रकरणी विशाल चंद्रकांत गेजगे (रा. चंदन नगर कोडोली), रोहन भोईटे (रा. गोडोली) आणि शांताराम गायकवाड (रा. कोडोली) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 92 हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
साताऱ्यात चक्री जुगार प्रकरणी तीन जणांवर कारवाई; सुमारे 92 हजारांचा मुद्देमाल जप्त
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा