एकाच्या फ्लॅटमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : एकाच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून तिथे राहिल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन सुरेश भोसले रा. विकास नगर, तालुका सातारा यांच्या गोकर्णनगर, खेड येथील फ्लॅटमध्ये दि. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घुसून कोणताही हक्क नसताना तिथे राहिल्याप्रकरणी सागर विठ्ठल राक्षे, विठ्ठल राक्षे, सागर विठ्ठल राक्षे यांची आई व पत्नी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सपकाळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोंडवे ते शाहूपुरी जाणाऱ्या रस्त्यावर अपघात प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात चक्री जुगार प्रकरणी तीन जणांवर कारवाई; सुमारे 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या