सातारा : विवाहितेवर अत्याचार तसेच तिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 व 28 जुलै रोजी सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहितेच्या घरात येऊन विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करून तसेच तिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी सुशांत शुक्राचार्य साबळे यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा