नागठाणे गावच्या हद्दीत दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : दुचाकी अपघातात एकाच्या मृत्यू सह एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी रात्री दहा वाजता नागठाणे गावच्या हद्दीत पुणे बेंगलोर महामार्गावर गणेश एकनाथ गाढवे राहणार खंडाळा तालुका खंडाळा जिल्हा सातारा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 इए 4790 भरधाव वेगात चालवून हायवेवर डायव्हर्शन करता लावलेल्या सिमेंट काँक्रीट ब्लॉकला धडकवून अपघात केला. या अपघातात गाढवे यांचा मृत्यू झाला असून गणेश दत्तात्रय चव्हाण रा. लोणी, ता. खंडाळा, जि. सातारा हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
त्या विद्यार्थिनीची आत्महत्या मानसिक तणावातून; वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांची माहिती
पुढील बातमी
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

संबंधित बातम्या