मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालकपदी सहकार तज्ज्ञ अंकुश जाधव यांची बिनविरोध निवड; कोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालकपदी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक व सोळशी (ता. कोरेगाव) गावचे सुपुत्र अंकुश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण (भाऊ) दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

या निवडीनंतर विविध सहकारी पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार करण्यात आला, तर दरेकर यांनी अंकुश जाधव यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले.
अंकुश जाधव यांनी गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ सहकार क्षेत्रात सनदी लेखापरीक्षक (ऑडिटर) म्हणून भरीव योगदान दिले आहे. राज्यातील सुमारे ५०० हून अधिक बँका आणि सहकारी पतसंस्थांच्या लेखापरीक्षणाचे काम त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. अवसायनात निघालेल्या व आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन करत त्यांनी तोट्यातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली असून, त्यांच्या या अभ्यासपूर्ण कार्यामुळे ग्रामीण व नागरी सहकार चळवळीला नवी उभारी मिळाली आहे.
अंकुश जाधव यांच्या या निवडीबद्दल माजी सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सह्याद्री सहकारी बँकेचे माजी चेअरमन पुरुषोत्तम माने, ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे जिजाबा पवार, शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अविनाश भोसले आणि महाराष्ट्र कंझ्युमर फेडरेशनचे विठ्ठलराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच शालिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष भानूदास जाधव, गुरुमाऊली सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विष्णू शेलार, माझगांव डॉक एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष महेश शेवाळे, उपाध्यक्ष शरद पवार, माजी संचालक राजेंद्र वाघमारे व सदस्य संदेश हांडे, जनसेवक को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक विनोद शिंदे, मुंबई पोलीस दलातील शिवाजीराव पाटणकर, दिव्यजनसेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक अमोल पाटील, श्री समर्थ सेन्ट्रल कन्झ्युमर्सचे संचालक गणेश गवते, लेखापरीक्षक ईश्वर चव्हाण व दिनेश देवधरे, पुष्पक को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक किरण पवार, तात्यासाहेब मोहिते पतसंस्थेचे सीईओ किशोर गोंदुकुपे, मुंबई बँकेचे माजी संचालक बी. डी. पारले, दत्तदिगंबर को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक लक्ष्मण निकम, लक्षद्वीप सहकारी पतसंस्थेचे खजिनदार पी. वाय. पाटील, शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मेवालाल यादव, कर्ज वसुली अधिकारी महादेव तांबे, सहकार नेते संभाजी भोसले, मुंबई डॉकचे सीईओ विश्वास तुपे, खटाव तालुका को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संचालक दिलीप देशमुख व संजय देशमुख, मुंबई सहकार बोर्डाचे माजी संचालक उत्तम चव्हाण व माजी सचिव सुहास बने, भांडुप सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रवीण घाडगे आणि विश्वासाई कन्सलटन्सीचे अशोक पागीरे यांनी अंकुश जाधव यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाय. सी. कॉलेजमधील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण : सखोल चौकशीच्या मागणीसाठी 'अभाविप' आक्रमक; कॉलेज परिसरात जोरदार निदर्शने
पुढील बातमी
गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी घाला; गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन

संबंधित बातम्या