वळसे येथून दुचाकीची चोरी; बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 02 September 2026


सातारा : वळसे येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तुषार चंद्रकांत कदम (रा. वळसे, ता. सातारा) यांची एका शेडच्या आडोशास लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 एव्ही 7614 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मांडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

संबंधित बातम्या