सातारा : येथील पठारावरील यंदाच्या पुष्प हंगामाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कास पठारावर पर्यटकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या सोवेनियर शॉप, पर्यटक निवारा शेड, तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण आले.
कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांना अधिक दर्जेदार व सुविधायुक्त पर्यटन अनुभव मिळावा, तसेच पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने वन विभागाच्या माध्यमातून विविध सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. या विकासकामांची पाहणी करून खासदार उदयनराजेंनी वन विभागाच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
कास पठाराच्या पर्यटन व्यवस्थापनामध्ये प्रथमच ‘हिरकणी’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कास पठार वन समितीचे अध्यक्ष सीताराम बादापुरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पर्यटकांच्या सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी उपवनसंरक्षक, सातारा अमोल सातपुते यांच्या हस्ते कास पठार वन विभाग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कास पठाराचे संवर्धन, पर्यटक व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांना यामुळे अधिक बळ मिळणार आहे.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, सुनील काटकर, सुशील मोझर, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धळ, दिगंबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक, कराड जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, समितीचे उपाध्यक्ष प्रदीप कदम, सदस्य ज्ञानेश्वर आखाडे, प्रा. शेखर मोहीते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कास पठारावर खासदार उदयनराजेंच्या हस्ते नव्या सुविधांचे उद्घाटन; वन विभागाच्या उपक्रमांचे केले विशेष कौतुक
by Team Satara Today | published on : 02 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा