देशात टोलचा मोठा घोटाळा उघडकीस; संशयास्पद व्यवहार होत असल्याचा संशय, ईडीचे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील टोलनाक्यांवर छापे

by Team Satara Today | published on : 02 September 2026


दिल्ली  : देशभरातील अनेक रस्ते आणि महामार्गांवर उभारण्यात येणाऱ्या टोल नाक्यांवरून मोठा घोटाळा होत असल्याची शक्यता आहे. देशातील सुमारे २०० हून अधिक टोलनाक्यांवर संशयास्पद व्यवहार होत असल्याचा संशय असून,  त्या पार्श्वभूमीवर आज ईडीने महाराष्ट्रासह  देशभरातील सुमारे १४ टोलनाक्यांवर धाडी टाकल्या आहेत.
ईडीने आज टाकलेल्या धाडींमध्ये महाराष्ट्रासह, उत्तर  प्रदेश, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील टोलनाक्यांचा समावेश आहे. या टोलनाक्यांवरून वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय आहे. त्यात ट्रकसारख्या मोठ्या वाहनांना बनावट फास्टॅग लावून फसवणूक करण्यासह खोटे सॉफ्टवेअर तयार  करून त्यावरून बनावट पावत्या देण्यासारखे प्रकार उघडकीस आले आहेत. टोलनाक्यावरील कर्मचारी,  संचालक आणि आरोपींच्या संगनमतातून हे प्रकार घडत  असल्याचं उघडकीस आलं आहे.
देशातील सुमारे २०० हून अधिक टोलनाक्यांवर संशयास्पद व्यवहार होत असल्याचा संशय असून, संशयास्पद व्यवहार होत असलेल्या २०० पैकी तब्बल १०० टोलनाके हे  एकट्या  उत्तर प्रदेशमधील असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
पुढील बातमी
पुसेगाव बाजारपेठ कडकडीत बंद, रस्त्याच्या कामाबाबत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, मुख्य बाजारपेठेतूनच महामार्ग रस्ता झाला पाहिजे

संबंधित बातम्या