पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवात लेझर लाईट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यांना प्रचंड त्रास झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काहींच्या डोळ्यांना इजा झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. पोलिसांनाही या लेझर लाईटसचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू केले आहेत.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हाधिकारी यांनी निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जनाचे मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सचा वापर केल्यास कारवाई; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
by Team Satara Today | published on : 01 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा