सातारा : साताऱ्यात तब्बल ३३ वर्षानंतर शतकपूर्व म्हणजे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. सातारकरांच्या सहकार्याने हे संमेलन लोकसंमेलन झाले. मोठ्या दिमाखातहे संमेलन झाले यात सर्व समिती सदस्य, देणगीदार, प्रशासन व सातारकरांचा मोठा सहभाग आणि सहकार्य होते यापुढेही सातारकरांसाठी अशाचा मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्याचा प्रयत्न करु, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी मधील सहभागी शाळांना प्रमाणपत्र वाटप व बक्षीस समारंभप्रसंगी मंत्री भोसले बोलत होते. व्यासपीठावर मावळा फाउंडेशन, मसापाचे कार्यकारणी सदस्य किशोर बेडकीहाळ, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि मान्यवर उपस्थित होते. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान झाले होते. यावेळी भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी शाळांना सहभाग प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तसेच उत्कृष्ट पंचवीस चित्ररथांना तसेच उत्कृष्ट वाद्यपदकांना प्रमाणपत्र गौरव चिन्ह व बक्षीस चिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा समारंभ संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही झाला.
यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, म्हणाले सर्व सातारकरांच्या सहकार्याने ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखदारपणे साजरे झाले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद धाराशिव डॉ. रवींद्र सिद्धेश्वर खंदारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद सातारा धनंजय लक्ष्मण चोपडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारा अनिस मुसा नायकवडी, शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद सातारा श्रीम. शबनम गुलाब मुजावर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारा सन्मति कैलास देशमाने यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथ दिंडीचे परीक्षण करणारे शेखर हसबनीस, सागर सुतार, अभिजीत शिंदे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध शाळांचे प्रतिनिधी तसेच ग्रंथदिंडी समितीचे सदस्य आर.पी निकम, किरण कदम, उमेश पाटील, ॲड. अनिरुद्ध जोशी, वजीर नदाफ, सचिन सावंत, अमर बेंद्रे, तुषार महामूलकर, अनिल जठार, विविध क्षेत्रातील मान्यवर, सातारकर, साहित्यप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले.
सातारकरांच्या सहकार्याने साहित्य संमेलन यशस्वी
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ; ग्रंथदिडींतील सहभागी शाळांना बक्षीस वाटप
by Team Satara Today | published on : 31 August 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा