आझादनगर परिसरातील घराच्या पार्किंगमधून बुलेटची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 31 August 2026


सातारा : आझादनगर परिसरातील घराच्या पार्किंगमध्ये उभी केलेली बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. 25 ऑगस्टच्या दुपारपासून 26 ऑगस्टच्या सकाळपर्यंत ही चोरी झाल्याचे समोर आले.

याबाबत विनोद सुरेश परदेशी (वय 37) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घराच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे 30 हजार रुपये किंमतीची बुलेट त्यांच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही मोटारसायकल फिर्यादीचे सासरे शरदसिंग शंकरसिंग राजपूत यांच्या नावावर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोलीतील कामाठीपुरा परिसरात मारहाण, विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
सातारकरांच्या सहकार्याने साहित्य संमेलन यशस्वी

संबंधित बातम्या