संगम माहुली येथील हॉटेलसमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 August 2026


सातारा : संगम माहुली येथील हॉटेल सिद्धिविनायकसमोर पार्क केलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे.

ही घटना 21 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते 22 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरीस गेलेली मोटारसायकल हिरो कंपनीची स्प्लेंडर, काळ्या रंगाची असून त्यावर निळ्या रंगाचे पट्टे आहेत. तिचा क्रमांक एमएच-11-डीएम-5536. सदर मोटारसायकल हॉटेल सिद्धिविनायकसमोर पार्क करण्यात आली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने ती लबाडीने चोरून नेली. सकाळी मोटारसायकल चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रहिमतपूर पोलिसांनी 24 तासांत शोधले चोरीचे सोने; विधिसंघर्षित बालक ताब्यात; दोन लाखांची सोन्याची चेन हस्तगत
पुढील बातमी
साताऱ्यातील जुनी एमआयडीसी परिसरात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या