लिंब येथे आज (शनिवारी) सावता महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा; विविध कार्यक्रमांचे आयोजन

by Team Satara Today | published on : 28 August 2026


सातारा : लिंब, ता. सातारा येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. दि. 29 ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक लिंब गावातून काढण्यात येणार असून सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी कलशारोहण कार्यक्रम पार पडणार असून दुपारी बारा वाजता ह.भ.प. महादेव महाराज बरसाळे यांचे सावता महाराजांच्या जीवनावरती सुश्राव्य कीर्तन पार पडणार असून दुपारी तीन ते आठ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार झाले असून आजपासून दररोज संध्याकाळी भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी लिंब व पंचक्रोशीतील सर्व लहानथोर मंडळींनी उपस्थित राहावे, असे संत शिरोमणी सावता महाराज मंडळ लिंब यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात युवकास मारहाण प्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांना ‘भीम ज्ञानयोद्धा’ सन्मान

संबंधित बातम्या