सातारा : सावकारकीच्या त्रासाला कंटाळून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी योगेश अशोक सुतार (रा. गेंडामाळ नाका, शाहूपुरी, सातारा) यांना अमित शिंदे (रा. झरेवाडी), अक्षय दळवी -रोहित दळवी (दोघेही रा. परळी), दत्तात्रय जगताप (रा. भोंदवडे), सावंत (रा. गेंडामाळ सातारा), शिवांश कन्स्ट्रक्शन जकातवाडी, सातारा यांनी व्याजाने पैसे दिले होते. मात्र सुतार यांनी व्याजाचे पैसे देऊनही संबंधित त्यांना त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून सुतार दि. 26 रोजी कुठेतरी निघून गेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.